पुस्तकाबद्दल
विटाळ तो परद्रव्य, परनारी
त्यापासूनि दुरी तो सोवळा
अशी ‘सोवळेपणा’ची नितांतसुंदर व्याख्या जगदगुरू संत तुकाराम महाराजांनी केलीय. तो निकष आजच्या काळात लावला तर परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच नैतिकता, चारित्र्य आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती करायची असेल तर शांताराममहाराज निम्हण यांच्यासारख्या महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.
सदा नामघोष करु हरिकथा
तेणे सदा चित्ता समाधान
असे संतवचन आहे. आयुष्यभर हा विचार मंत्र म्हणून जपणारे शांताराम महाराज आजच्या काळाचे खरे संत आहेत. आपण देव पाहिला नाही, तेवढे आपले भाग्य थोर नाही पण देवमाणूस पाहायचा असेल तर एकवेळ शांताराममहाराजांना नक्की भेटा.
त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या गौरवग्रंथाच्या माध्यमातून त्यांना वंदन करतो आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आम्ही केलेला हा प्रयोग आपल्या पसंतीस उतरेल याची अपेक्षा बाळगतो.
– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक
Reviews
There are no reviews yet.