विनोबांची शिक्षणछाया

 250.00  200.00

या पुस्तकाचे शीर्षक आहे, ‘विनोबांची शिक्षणछाया!’ आता ‘छाया’ म्हटले की, गारवा आला. तळपत्या उन्हात, अंगाची काहीली होताना या गारव्याचे महत्त्व प्रकर्षाने पटते. आजची यंत्रणेची सगळी वाताहत पाहता या गारव्याची कधी नव्हे इतकी गरज सध्या आहे. आपल्या श्रेष्ठतम परंपरेतील आचार्य विनोबाजींसारख्या महनीय व्यक्तिमत्त्वाचे विचार समजून घेणे अनिवार्य आहे. विनोबा म्हणतात, ‘‘एक दिवस मी उन्हात फिरत होतो. चहूकडे मोठमोठे हिरवे वृक्ष दिसत होते. मी विचार करू लागलो की वरून इतके कडक ऊन असताना हे वृक्ष हिरवेगार कसे? त्यावेळी लक्षात आले की, जे वृक्ष वरून इतके हिरवेगार दिसत आहेत त्यांची मूळे जमिनीत अति-खोल गेली आहेत आणि तेथून ते पाणी घेतात! याप्रमाणे आम्हाला आतून भक्तिचे पाणी आणि बाहेरून तपश्चर्येचे ऊन मिळाले तर आम्ही उंच वृक्षांप्रमाणे हिरवेगार होऊ!’’

958 in stock

पुस्तकाबद्दल

या पुस्तकातील प्रकरणांच्या शीर्षकातूनही विषयाचे महत्त्व आणि विनोबांच्या विचारांची अथांगता लक्षात येते. वाणगीदाखल काही शीर्षके पाहा – ज्ञानाची भूक हेच शिक्षण, सत्तामुक्त शिक्षण हवे, जीवन हेच शिक्षण, स्वावलंबनातून साधेल समता, शिक्षण ‘दासी’ नको ‘राणी’ हवी, ज्ञानप्रसारासाठी मातृभाषाच हवी, श्रमाची प्रकाशवाट, आनंदाहूनी थोर मज नाही काही, गाव तिथे विद्यापीठ, अनुभवाचे पुस्तक हवे.
हे पुस्तक पालकांनी आणि शिक्षकांनी गंभीरपणे वाचायला हवे. ‘माणूस’ घडण्याच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड ठरेल. असे म्हणतात की, आपण आमदार झालो नाही तरी चालते, खासदार झालो नाहीत तरी चालते पण ‘समजदार’ मात्र असायलाच हवे. ही ‘समज’ निर्माण व्हायची असेल आणि चांगल्या-वाईटातील फरक समजून घेत स्वतःला सिद्ध करायचे असेल तर संदीप वाकचौरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर अलीबाबाची गुहाच उघडली आहे. त्यांनी दिलेला हा ज्ञानरूपी खजिना आपल्या समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही.
सर्व वाचकांच्या वतीने ज्ञानसाधक संदीप वाकचौरे सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या आगामी लेखनसंकल्प सिद्धीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विनोबांची शिक्षणछाया”

Your email address will not be published. Required fields are marked *