अंतरीचे रंग

 200.00  160.00

सौ. सुरेखा अशोक बोर्‍हाडे यांचा स्त्री जीवनावरील ‘अंतरीचे रंग’ हा ललित लेखसंग्रह. यात स्त्रियांच्या भावजीवनाचे असंख्य कंगोरे आपल्याला दिसतात. म्हणाल तर हे ललित गद्य आहे, म्हणाल तर वैचारिक चिंतन. अनुभवाचे सच्चेपण हा या लेखनाचा मुख्य विषय आहे.
स्त्री जीवनातील सौंदर्य, त्यांच्या जगण्यातील बारकावे, आनंद, अस्मिता, दुःख यांना त्यांनी सहज शैलीत व्यक्त केले आहे. त्यांची लेखांची भाषा सहज, ओघवती आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. त्यातून त्यांचा अभ्यासही दिसून येतो. त्यांचं पारदर्शी व्यक्तिमत्त्व आपल्याला शब्दाशब्दातून भेटतं. हा लेखसंग्रह वाचनीय आणि विचार देणारा आहे.

300 in stock

ISBN: 9789386421517 Category: Tag:

पुस्तकाबद्दल

अनेकदा अनेकजणी पुरूषांना ठोकून स्त्रीवाद सिद्ध करतात. अनेकजण बायकांवर अन्याय-अत्याचार करून पुरूषी अहंकारही दाखवून देतात. अर्थात, हे सारं करताना दोन्ही बाजूंनी स्त्री-पुरूष समानतेचा खोटा जयघोष सुरू ठेवणं हेही त्यांच्यासाठी अपरिहार्य असतं. एकंदरीत काय, समानतेच्या देखाव्याची झुल आणि वर्चस्ववादी अहंकाराची जळमटं माणुसपणाला पोखरत असतात. अशावेळी सांमजस्याची भूमिका घेत समन्वय साधणं आणि एक निर्मळ, निर्व्याज, पवित्र नातं निभावणं गरजेचं असतं. सुरेखा बोर्‍हाडे यांनी अतिशय संवेदनशीलपणे या पुस्तकाच्या माध्यमातून ही किमया पार पाडलीय.

सध्या आपले पंतप्रधान सांगतात, ‘आत्मनिर्भर व्हा!’ अशा सगळ्या ढोंगी प्रवृत्ती उफाळून आलेल्या असताना ‘आत्मनिर्भर’ कसं व्हायचं याचं आत्मभान देण्याचं काम हे पुस्तक करतं. अंतरीचे नाना रंग उलगडून दाखवताना कुठंही द्वेष नाही, कुणाला कमी लेखणं नाही की उपदेशाचा डोस पाजण्याचा आव नाही. अतिशय प्रांजळपणे आणि तितक्याच सजगतेनं, सहजतेनं केलेलं हे चिंतन आहे. सुदृढ समाजनिर्मितीसाठी एका मातृशक्तीनं दिलेलं हे बाळकडू आहे. या पुस्तकाच्या वाचनातून अनेकांचं आत्मबळ वाढेल, आत्मप्रेरणा जाग्या होतील आणि एकमेकांकडं ‘माणूसपणा’च्या नजरेतून पाहण्याची व्यापक दृष्टी विकसित होईल असं मला वाटतं.
– घनश्याम पाटील

अधिक माहिती

लेखिका

सौ. सुरेखा अशोक बोर्‍हाडे

पाने

१४४

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंतरीचे रंग”

Your email address will not be published. Required fields are marked *