निवडुंग व इतर नाटके

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

निवडुंग ही वाळवंटी प्रदेशातली काटेरी वनस्पती आहे. ती कोरड्या आणि उष्ण वातावरणात तगून राहते. हा मानवी गुणधर्म नाही. घरातील वातावरण कोरडे आणि शुष्क असेल तर कोणीही कोमेजून जाईल. ‘निवडुंग’ या नाटकातील वीणा मात्र आजूबाजूच्या मानवी वाळवंटावर मात करून आपल्या कोमेजलेल्या भावना फुलवण्याचा प्रयत्न करते. तिची शोकात्मिका मांडताना नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी जे समाजचित्रण केले आहे ते अनेकांची हिडीस वृत्ती दाखवून देणारे आहे.

सरोगेट मदर हा प्रकार सर्वश्रुत आहे; मात्र या नाटकात उपचारासाठी पत्नी बनून आलेली सीमा सतीशवर प्रेम करून त्याला त्याच्या आजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पौंगडावस्थेतील लैंगिक शोषणामुळे स्वत्व हरवलेल्या सतीशला माणसात आणतानाचा मानसिक संघर्ष विलक्षण आहे. रूग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर देवदूताप्रमाणे काय करू शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण ‘सरोगेट’ या नाटकात दिले आहे. यातील बाईसाहेब आणि सीमा या दोन्ही स्त्रियांचे चेहरे आणि मुखवटे वाचकांना अंतर्मुख करतात. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची मनोविश्लेषणाची क्षमता अफाट आहे.

‘द डेथ’ हे या पुस्तकातील नाटक एका एचआयव्ही बाधित पोलीस अधिकार्‍याची शोकांतिका मांडते. कोणताही संवेदनशील माणूस हे वाचताना आपल्या भावना आवरू शकणार नाही. एखाद्या चुकीमुळे सुखी कुटुंबाची होणारी वाताहत आणि नातेसंबधातील स्वाभाविक बदल याचे वस्तुनिष्ठ चित्रण या नाट्यकृतीत आले आहे. यातील निरागस सायलीचे वर्णन वाचताना डोळे कधी पाणावतात ते आपल्याही लक्षात येत नाही. बाप-लेकीचं हे नातं चिरंतन आहे. वेळ हातातून निघून गेल्यानंतर काही चुका सुधारणे, कुटुंबाला सावरणे अशक्यप्राय बनते. अशा कठीण प्रसंगी पत्नीची, मित्राची, मेव्हण्याची साथ हे चांगुलपणावरील श्रद्धा वृद्धिंगत करते.

500 in stock

पुस्तकाबद्दल

‘निवडुंग’, ‘सरोगेट’ आणि ‘द डेथ’ ही प्रयोगशील नाटके वाचताना कधी हुंदका दाटून येतो, कधी एखाद्या पात्राचा अभिमान वाटतो, कधी आनंद आणि समाधानाने मन खुलते तर कधी गूढ खिन्नताही दाटून येते. सामाजिक संदेश देतानाच आपल्या शब्दसामर्थ्याने वाचकांना खिळवून ठेवण्याचे डॉ. मुटकुळे यांचे कसब म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे.

– घनश्याम पाटील