पुस्तकाबद्दल
‘दृष्ट शक्तींवर सत्प्रवृत्तींचा विजय’ हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मृत्युनंतरचे जग कसे असते? किंबहुना ते असते का? यावर अनेकांची अनेकानेक मते आहेत. तरीही भुताखेतांच्या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो. अनेक गावात आजही एक तरी जुना म्हातारा भेटतो की तो, सांगत असतो ‘माझ्या तरूणपणी मी भुतांसोबत कुस्ती खेळली!’ श्रद्धा-अंधश्रद्धेच्या वादात न पडता केवळ साहित्य म्हणून या कथांकडे बघितले तर अनेकांना वाचनानंद घेता येईल, या कथा वाचताना किंवा वाचल्याने आपल्याला कोणतेही भूत झपाटणार नाही मात्र वाचनात आपण एकाग्र होऊन त्यात झपाटून जाल हे मात्र नक्की ! चंद्रलेखा बेलसरे यांच्या लेखनाचे हेच तर सामर्थ्य आहे, आपल्या कसदार लेखणीच्या माध्यमातून त्या वाचकांना खिळवून ठेवण्यात कमालीच्या यशस्वी होतात. त्यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणेच या कलाकृतीलाही आपल्याकडून तसाच भरभरून प्रतिसाद मिळेल, या अपेक्षेसह !
-घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक
Reviews
There are no reviews yet.