परिवर्तनाची वाट

 250.00  200.00

मूल खेळात जसे तासनतास रमते  त्या प्रमाणे शाळेच्या अभ्यासाच्या तासिकेत मात्र रमत नाही. त्याचे लक्षही लागत नाही. याचे कारण काय?” असा प्रश्न जे कृष्णमूर्ती यांना करण्यात आला. तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते, “समर्पण! संगीतकार सातत्याने रियाज करत असतो. त्याची साधना असते आणि त्यासाठी स्वतःला झोकून देणे असते. त्या समर्पणाच्या वृत्तीने अनेक लोक त्याच्या संगीत कार्यक्रमात स्वतःला विसरतात. श्रोत्यांची दाद जी असते ती संगीतकाराच्या समर्पणाला ! खेळाच्या बाबतीत देखील असे समर्पण असतेच. अभ्यासाचे विषय शिकविणाऱ्या माणसात देखील समर्पण असायला हवे. शिक्षणात तसे होत असेल तर निश्चित बदल घडताना पाहावयास मिळेल.” कृष्णमूर्ती यांच्या या सुंदर उदाहरणातून परिवर्तनाच्या वाटेचे महाद्वार या पुस्तकात प्रभावीपणे उघड केले आहे.

897 in stock

पुस्तकाबद्दल

सातत्याने शिक्षणविषयक लेखन करताना असे समर्पण आणि निष्ठा दाखवून देणारे मराठीतील नामवंत लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणजे संदीप वाकचौरे, परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम आहे, हे सर्वमान्य सत्य आहे. त्यामुळे या वाटेवरून चोखंदळपणे चालताना अभ्यासाची साधना महत्त्वाची ठरते. संदीप वाकचौरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणातील परिवर्तनाच्या वाटेचा सुयोग्य धांडोळा घेतला आहे. या पुस्तकमालिकेतील त्यांची एकाहून एक सरस पुस्तके इथल्या शिक्षणव्यवस्थेसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहेत. राज्याचे शैक्षणिक धोरण आखताना संदीप वाकचौरे यांचे सहकार्य घेतल्यास किंवा अगदीच शक्य न झाल्यास त्यांच्या या पुस्तकमालिकेचा आधार घेतल्यास उद्याची पिढी एका मोठ्या अनर्थापासून वाचू शकेल. तुर्तास, बाकचौरे सरांचे हे लेखन अभ्यासकांनी, विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी गंभीरपणे वाचणे अत्यावश्यक आहे.

 

– घनश्याम पाटील

  लेखक, प्रकाशक आणि संपादक

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

136

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परिवर्तनाची वाट”

Your email address will not be published. Required fields are marked *